माझे इवले गोकुळ ..
माझ्या इवल्याश्या संगे रंगे इवले गोकुळ.. माझे इवले गोकुळ . ।
जातो कसा बाई वेळ अस्सा चोरपावलाने || धृ ।।
त्याच्या पावलात माझा जीव मागे घुटमळे ।
जात कामाला बाहेर कानी वाजती ग वाळे ।।१।।
त्याचे लाघव आठवे , हसू गालावर खेळे ।
काम राहिले बाजूला माझे पाझरले डोळे ।।२।।
बाळ बसता अंगणी पसरून खेळ सारे ।
माझ्या घरात सुखाचे बाई वाहती ग वारे ।।३।।
माझ्या इवल्याश्या संगे रंगे इवले गोकुळ.. माझे इवले गोकुळ .. ।
जातो कसा बाई वेळ अस्सा चोरपावलाने ||
सौ. विस्मयी बोकील.
No comments:
Post a Comment