सात रंगाचे धनुष्य आई आकाशात आले
चल चल लवकर पळ चल लवकर लपून कसे बघ गेले ||धृ ||
टप टप टप टप पडतो पाऊस, ऊन हि त्याच्या मागून धावे
किती मस्ती हि ओरड त्यांना, गुपचूप त्यांना सांग बसावे ||1||
बोलवती मज खेळायला, जाऊ कां ग त्यांच्या संगे
छान किती बघ रंग त्यातले, लपंडाव हा अवघा रंगे ||2||
अभ्यास बिभ्यास नको ग आत्ता , तुझी नि माझी करूया बट्टी
पावसात चल मस्त भिजूया , शाळेलाही पडली सुट्टी ||3||
सौ. विस्मयी भावे - बोकील.