Thursday, April 7, 2011

आई तुझ पिल्लू हळू हळू मोठ होतंय ..


आई तुझ पिल्लू हळू हळू मोठ होतंय ..

लागतायत ठेचा ,पडतंय खड्यात ...

पंखानाही खरचटय उडण्याचा प्रयत्न करताना

पण आपणहून उठतय आता ते...

पंखाना लागलेली माती आपणच साफ करतय

स्वताच स्वताला आता सावरायला शिकतंय...

जग असतंच आजू बाजूला पाहत हें सगळ

म्हणून कुणी उडण तर शिकवत नाही

स्वताच ठरवल्याशिवाय आभाळात झेपावण जमत नाही

दूर असणाऱ्या आभाळाची ओढ तर आहेच

पण जमिनीला खिळलेले पाय अजून सोडवत नाहीत...

एक दिवस नक्की येईल ..

जेह्वा तुझ रडक पिल्लू पंखात प्राण भरील

मातीचे पाय घेऊनच आभाळात झेप घेईल....

Wednesday, February 23, 2011

रात्री १ वाजता पाउस पडत असताना पाहत होते खिडकीतून ,तेह्वाची कविता.........

रात्री १ वाजता पाउस पडत असताना पाहत होते खिडकीतून ,तेह्वाची कविता.........




रात्रीच्या आभाळात तारकांचे दिवे

भुरूभुरू कुठे जाती ढगांचे हें थवे

चंद्र लपे ढगांच्या पुंजक्यांच्या मध्ये

लपाछपी खेळे वेडा चांदण्यांच्या सवे



गार रेशीम स्पर्शाचा मंद वारा वाहे

पावसाची चाहूल देत विजबाई चाले

आभाळ क्षणातच गच्च मेघांनी हें भरे

सरीवर सर , अंगावरी ये शहारे



टपटप पाणी जमिनीवर पडे

मातीचा सुगंध दशदिशात पसरे

शांत अंधारात खेळ सगळा चाले

मी एकटीच उभी न्याहाळत सारे



नीज हलके हलके पापणीत बोले

झाला उशीर ग बाई झोप चिमुकले

उब गोधडीची लागताच,मिटले ग डोळे

स्वप्नांच्या गावात माझे पाऊल ग पडे

Sunday, January 30, 2011

दक्षिणेची वारी -१ घर सोडताना ..

चेन्नई...Training location चा mail वाचला...
माझे डोळे ते नाव नसेलच भास झाला असेल अस वाटून पुन्हा पुन्हा पुणे हें नाव कुठे दिसतंय का ह्या शोधात होते
जीव गडबडून गेला एकदम... बंगलोर पर्यंत तयारी होती मनाची...( हें आपल म्हणायला ..बाकी प्रार्थना करत होते पुण्यासाठीच )
पण चेन्नई.... ये क्या हें भाई?? कहा से टपका ये नाम? मद्रासी काफी ,अण्णा,चौकडीच्या साड्या,काळे लोकं डोळ्यासमोर नाचायला लागले आणि तिथे जाऊन राहायचं???
२-३ दिवस रडून रडून येवढा गोंधळ घातला मी , तिथे जाण कस टाळता येईल यासाठी खूप प्रयत्न केले..लहान मुलासारखी कारण देत होते ..कि project नाही मिळाला तर ,पहिल्याच दिवशी परीक्षा असली आणि नापास झाले तर ..याव्व नि त्याव ..
शेवटी आईसाहेबांसमोर डाळ शिजली नाही आणि आमची स्वारी चेन्नई साठी सज्ज होण्यास तयार झाली..
मला अस चांगल्या कारणासाठी ढसा ढसा रडताना पाहून खरच किती हसली असतील लोक? लोकं कशाला आता मलाच माझ्यावर हसायला येतंय ..

नातेवाईकांनी आईची ती step पाहून तोंडात बोट घालायची बाकी ठेवली होती
कधी भटकायला न पाठवणारी हि आज चक्क लेकीला चेन्नई ला पाठवायला तयार झाली
मला तर आणि एकदा आई म्हणजे काय हें जाणवलं , हव तिथे प्रोत्साहन देणारी ,गरज नसेल तिथे अगदी घरात डांबून (दुसरा कोणताच शब्द इथे बसणार नाही ) ठेवणारी ...

माझ्या काकाच्या एका वाक्याने माझी भीती जरा कमी झाली होती ..."अग कुठेही गेलीस तरी माणसच असतात, इथ आणि तिथे कोणी वेगळ राहत नसत "..
ह्या माणसांच्या जीवावरच आता मी दक्षिणे कडे प्रयाण करणार होते ..माहित नव्हते कि खरच कशी माणस मिळतील ,माझ पटेल सगळ्यांशी कि नाही ,कि पळून येईन मी तशीच अर्ध्यावर डाव मोडून ?खरच मिळतील का चांगली माणस मला तिथे ?



माझा त्या वर्षीचा वाढदिवस म्हणजे fairwell party होती माझ्यासाठी ..काका,काकू,मैत्रिणी,शेजारी सगळे येत होते माझी तयारी कुठवर आली ,काही मदत हवी का ,जाणार कशी ?राहणार कुठे ?एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात,आपली पोरगी आज स्वतःच्या बळावर नोकरीसाठी बाहेर पडत आहे याच कौतुक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि पहिल्यांदीच बाहेर जाणार सगळ ठीक होईल ना याची काळजी युक्त भीतीहि ..

माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने सल्ला दिला ...इथे आहात तर सगळे चेहेरे पाहून घ्या माहित नाही किती महिने असे गोरे गोरे चेहरे पाहायला मिळतील कि नाही ...

अवघे १२ दिवसात सगळी तयारी करायची होती .झुकझुक गाडी काही आमच्या कमी येणार नव्हती .. शेवटी मावशी बाईंनी इमानाचा option दिला.. इमानाची तिकीट फाडून तयार झाली ..
पहिल्यांदीच आमच ध्यान विमानाला पाय लावणार ... घर सोडून पहिल्यांदाच बाहेर जाणार,bag pack करायची ...खूप काही काम कमी दिवसात उरकायची होती

माझ्या bag च तोंड मी आ वासून ठेवलं होत जस जे सुचेल जे दिसेल लागेल ते तस त्यात भरत चालले होते .शेवटी पूज्य पिताजी नि सल्ला दिला "विमानाने चाललो आहोत बापाच्या गाडीने नाही".. मग माझी bag वाण्याच्या दुकानातील वजन काट्यावरून २० किलो माप ओलांडून परत घरात आली ."घर सोडून चाललीस कि training ला चाललीस? सगळ घर भरून नेणार आहेस का " इति मातोश्री ...

शेजारची पोरगी रोज ताईची bag किती भरली बघून जाई आणि कुणाल मात्र मला bag भरायला देत नव्हता ,मी जे भरेन ते तो बाहेर काढत होता ..आपली चंदा कुठेतरी चालली आहे आणि त्याला तीला जाउ द्यायचं नव्हत ...

गावाला जाऊन कृष्णाचे आशीर्वाद घेऊन,सगळ्यांना भेटून झालं ..१९ डिसेंबर च्या रात्री मुंबई च्या गाडीत बसताना मैत्रीणीना senti message मारून झाले त्यांनीही senti reply देण्यात काही कमी ठेवली नाही ..जणू काही त्यांची मैत्रीण फार मोठे दिवे लावायला चालली होती परदेशात ...

खूप लोकं जातात कुठे कुठे पण मी पहिल्यांदीच माझ्या छोट्याश्या विश्वातून माझ्यासाठी मोठ्या असणारया विश्वात चालले होते ...माझ्यासाठी ते परदेशाहून कमी नव्हत ...
रत्नागिरी सोडताना मनावर खूप दडपण होते,पहिल्यांदीच बाहेर जायचं होत, training यशस्वी पणे पार पाडायचं होत.
माझ्यावर आई,बाबा,नातेवाईक ,मैत्रिणी या सगळ्यांची बोलून न दाखवता लादलेली अपेक्षांची ओझी सांभाळत मी रात्रीच्या अंधारात लुकलुकणाऱ्या दिव्यांत निजणाऱ्या छोट्याश्या रत्नागिरीला अलविदा केला...
आता पाहायची होती कधी रात्र न होणारी,अखंड झगमगणारी, माणसांच्या महापुरात कायम जागी राहणारी मोठी शहर ..
छोट्याश्या तलावातल पिल्लू आता महापुरात निघाल होत ....
मुंबई

पहाटेच्या पारी एक छोतुशी बस आम्हाला विमाना पर्यंत घेऊन गेली ...कधीतरी विमानात बसू अस स्वप्न हि न पाहिलेल्या मला हें सार अजूनही स्वप्न वाटत होत
लहान मुलांना एखादी गोष्ट प्रथमच पाहिल्यावर जस वाटत तसच काहीस माझ झालं होत .धडाधड सगळ्यांना message टाकले कि Now in Flight,waiting 4 tk off ..
Take off च्या वेळी लहान मुलासारख जोरात हुर्रे ओरडावस वाटत होत,नाचा व वाटत होत,
मी गालातल्या गालात माझ हसू कोंडून,कोणी बघत नाही ना आपल्याला पाहत होते.
विमानातल्या सुंदऱ्या बिचाऱ्या फेरीवाल्यासारख्या इकडून तिकडून खाण्या पिण्याच्या गाड्या फिरवत होत्या आधी पोटाला पट्टा कसे बांधा,काय करा,काय नका करू ह्याचा मुकाभिनय करून आता हें काम...बहुरुप्यासारख..तोंड रंगवून सगळी काम करा ...
पण मला त्यांच्या त्या थोबाडावर लावलेल्या make up च्या थरात बिलकुल interest नव्हता .. ते १.३० तास फक्त मी ढगांचे हलके पुंजके बघत होते ..बाकी काही दिसत नव्हत तरी काही दिसतंय का ह्या शोधात ....महाराष्ट्र , आंध्रप्रदेश,तामिळनाडू यांच्या न दिसणारया पण राजकारणात अस्तित्वात असणाऱ्या सीमा शोधत....

Thursday, January 20, 2011

बंगळूरू म्हणत थोड थांब ना जरा....

बंगळूरू म्हणत थोड थांब ना जरा, जाऊ नको मला सोडून ग अशी
अजून थांब जरा इथे बघ पाडेन तुला फशी

आणि जरा शिक कि ग कानडी
तुझ्याच मराठी ची बहिण बर हि

जाशीलच ग तू तुझ्या गावा
जाताना माझ्यावर थोडासा लोभ ठेवा

आलीस तेह्वा वाटल नव्हत रमशील तू इथे,
पाय रेंगाळतील इथल्या मातीत जाताना तिथे

कुडू कुडू कन्नडा आता म्हणशील का ?
भाषा कळते अशी बढाई आता मारशील ना ?


खूप खूप मजा केलीस, खूप फिरलीस
हळू हळू तुही इथली झालीस


इथले रस्ते आता साद घालू लागले तुला
जाताना बघ रडशील खूप,परत परत वळून बघशील तू मला


सोडून आलीस काही माणस तिकडे येताना इथे
आता परत तेच , जाताना तिकडे तुझी माणस इथे


राहा मजेत तुझ्या लोकात ,तुझ्या मातीत
थोडीशी जागा दे मलाहि तुझ्या स्मृतीत

जरा एक ओंळ जवळ ये जराशी

बरेच दिवस काही सुचत नव्हत , विषय खूप डोक्यात पिंगा घालायचे पण वहीवर काही उमटत नव्हत अचानक रात्री ११.३० ला ओळी सुचत गेल्या आणि बऱ्याच दिवसांनी सुखाची झोप लागली


जरा एक ओंळ जवळ ये जराशी
विचारांचेच मागे थैमान येते
पुन्हा परतती शब्द आपुल्या घराला
जसे ते मनात पाहुणेच होते


उलगडत बसते उद्वस्थ मन
मुके शब्द असतील अवशेष कोठे
एकाचा ना लागे दुसऱ्यास मेळ
मनाचा मनाला आता थांग कोठे ?


मिटता नयन तो दिसे घननीळ
जुनेच कोडे उलगडे नव्याने
मनाच्या धगीवर तो अंतरात्त बरसतो
आता शब्द माझे होती गुलाम

मी केलेला कवितेचा शेवट -----------------------

एका मैत्रिणीने एक कविता वाचली आणि तिला ती पुरुषांची बाजू घेणारी वाटली म्हणून तिने मला सांगितलं ह्या कवितेचा शेवट असा कर कि ती मुलींच्या बाजूची होईल आणि त्यातून मला सुचलेला हा कवितेचा उत्तरार्ध


मुळं  कविता
च्यायला परत हिचा फोन.
आणि पुन्हा तेच प्रश्न,
कुठे आहेस..?, कसा आहेस..?,
काय करतोssssssय ..,?
झाली का कामं..?
कप्पाळ माझं...!,

हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवरअसतो,
कधी मीटिंग मध्ये,
कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,
चायला, च्यायला परत हिचा फोन.......

कुठे पळून नाही जाणार,सायंकाळी येइल न घरी,
'तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते...,
सारं काही सांगेल.
झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , 'तू खुप बदललाय,
लग्ना अगोदर असा नव्हतास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे,इत्यादि, इत्यादि.
अगं, ' तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोखणार  कोण.?,
च्यायला परत हिचा फोन.......,

बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, ---- यू आणि काय काय..,
SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन,
च्यायला परत हिचा फोन.......,
 
 
 
  मी केलेला कवितेचा शेवट -----------------------
 
च्यायला .. गेली कुठे हि हरवली कुठे ??
खरच हि बोलणार नाही ???
lunch ची वेळ झाली अजून हिचा फोन नाही साधा sms पण नाही ? ? ?
हिला अस काय झाल ..
boss बरोबर बोलताना लक्ष सतत mobile कडेच आहे
आत्ता हिचा फोन येईल मग हिचा sms येईल ..


गाडी चालवताना पण ५० वेळा थांबलो
फोन vibrate होतोय भास होऊन
वाटल शेवटी करेल आता sms ...



अग... तुझ्याच... कसा आहेस?
कुठे आहेस ??
जेवलास का ?
झाली का काम ???
ह्या प्रश्नांची मनापासून वाट बघत असतो ग मी ...
च्यायला अग तुला अस कस हे सांगू मी ??


च्यायला हिचा तर आज पत्ताच नाही ...
कस सांगू हिला कि मी हिच्याच sms वाट पाहत असतो
दिवसभराच tension तिच्यावर काढून मोकळा होतो
मग हळूच तिचे sms काढून काढून वाचतो
मीही मनातल्या मनात तीला i love u , i miss u म्हणतो



लग्न झाल वाटल ...
हिच्यावर माझा पूर्ण हक्क आहे..
आत काय ती माझीच तर आहे
हे कस लक्षात आल नाही कि तिचाही माझ्यावर तेवढाच हक्क आहे
मीही तेवढाच तिचाच आहे ...


श्या .. दिवस भर हिच्याच विचारात ..
कामाचे वाजले तीन तेरा...
च्यायला.. काढला फोन पटकन
लिहील i miss u dear झटकन ...
दिला पाठवून तिला...



तरी पण हीच मौन काही सुटत नाही
तिचा आवाज ऐकावासा वाटतोय...
तीला माझ्या भावना कळत का नाहीत????
च्यायला अग ए ..उचल ना फोन ...
जीव घेणार का ग माझा ???
बदला का घेतेस स्वताला पण त्रास करून ...???
ओरडत नाही ग तुझ्यावर...
बस... तुझा काळजीचा स्वर ऐकायचा आहे ....