सोनेरी झळझळणार IT च जग
सोनेरी झळझळणार IT च जग
सकाळी उंच टॉवरच्या कांचात चमकणारा सूर्य
पहाटेला आता alarm आधीच जाग येते
कारण आधी आर्जवाने मग "उठ आता गधडे" म्हणायला आई जवळ नाही
हरवलेय बाबांच्या हाताच्या वाफाळत्या आल्याच्या चहाची चव
उरलाय फक्त cafe coffee day च्या lemon iced tea चा थंडपणा
आईच्या हाताचा वरण भात,त्यावर ओतलेले साजूक तूप
तेही पंचपक्व्वान वाटतंय आता खाताना cafeteria तल बेचव जेवण
college मध्ये अख्खा दिवस गप्पांना खंड नसायचा
आता शनिवार ,रविवारची वाट पाहत रोजचा दिवस संपवायचा
project,billable status च्या धबडग्यात हरवलेय कुठेतरी माझ्यातली मी
तिला शोधताना पुन्हा आणखी हरवत जातेय मी
क्षिताजात वसणार सुखदायक IT च जग लांबून छान छान दिसणार
जवळ गेल कि हळूच साबणाच्या फेसासारख नाहीस होणार
मन...अवखळ झऱ्या सारखे .. कधी शांत कधी खळखळ वाहणारे . . कधी झूळूझुळू वाहणारे कधी फेसाळून येणारे . .
Sunday, August 8, 2010
Saturday, August 7, 2010
पहिल्या ( ? ) प्रेयसीस ...
जाणवत मला तुझ माझ्याकडे पाहून हळूच हसण
मैत्रिणींच्या घोळ्क्यातही तुझ एकाकी असण
माझी सर्व वाक्य झेलण्याचा व्यर्थ प्रयत्न करण
आणि ते पुन्हा पुन्हा आठवून स्वत:शीच हसण
मी तुझ्यामागे असताना का ग नाही तुला जमल?
तुझी उशीरच पेटते हे आता ध्यानी आल
नाही म्हणालीस तेव्हा आभाळ फाटल्यासारख वाटल
पण, आता खरच अगदी खर सुटल्यासारख वाटल
तुला माहितेय तरीही तुझी मला केवढी दशहत आहे?
तू नसताना तुझ्या मैत्रीणीना पाहण्यात केवढी गम्मत आहे
नाही म्हणाली होतीस तर का पुन्हा मरतेयस
दुसरी जरा पटलेय का ग मध्ये येतेयस?

मोठ्यांच्या जगात. ..
( माझा छोटा शेजारी कुणाल(वय वर्ष पाच ), ज्याच्यावरची माझी कविता वाचून मला blog लिहिण्याचा खूप जणांनी सल्ला दिला.म्हणूनच पहिली post त्या कवितेची. .
कुणाल . मला " चंदा " म्हणणारा . .
मी चेन्नई ला Wipro Training साठी जाताना तो खूप रडला,त्याच्या मायेच्या पाशातून माझा पाय घरातून निघायला तयार होत नव्हता .. )
मोठ्यांच्या जगात. ..
मोठ्यांच्या जगात असच असत मनुडी
तिथे ठरवून सुद्धा लहान होता येत नाही
तुझे हात हळुवार सोडताना किती दुख होतंय ,
पण तुला कस सांगू ,अले तू तेवढाही मोठा नाही
मी ऑफिस ला गेले त तू माझ्याशी कट्टी करणार म्हणतो ,
वेड्या तुझ्यासाठी तर जीव मागे मागे येतो ,
तुझ्याही नकळत माझ्या दु:खात सावरलस तू मला ,
निरागस हास्याने जगातला सुंदरपणा दाखवलास मला.....
पण तुझ्या छोट्या जगातल्या चंदाला मोठ्या जगात उगवाव लागेल
कारण मोठ्यांच जग किती छोट असत ते तुला मोठ झाल्यावर कळेल .....

Subscribe to:
Posts (Atom)