गोड गोड गोष्टी
( पुरातत्व खात जस काहीतरी इसवी सन पूर्व वगेरे वगेरे जून शोधून काढत, तस काहीतरी आज मला माझी जुनी वही चाळंताना 3 वर्षापूर्वीच काही मिळालंय,.काळं कसा जातो कळत नाही .. कारण प्रमुख व्यक्तीरेखेतली आता एक सातवी आणि एक मोठ्या बालवाडीत गेलंय ,TV वरच्या मालिकांसारखा आणि एका पात्राच आगमन झालाय तेही आता १० महीन्याच आहे .)
अलीकडे आमच्या घरी कोणाचा फोन आला तर पहिली चौकशी होते ती आमच्या दोन शेजारयाची जे म्हणायला शेजारी पण फक्त झोपणे जमलंच तर कधी मधी जेवण या दोन गोष्टीकरता स्वगृही असतात ..
तर ह्यातलं एक कारट ९ वर्ष पूर्ण १० चालू ह्या अवस्थेत आणि एक उमद व्यक्तिमत्व अवघ्या दोन वर्षाचे ..असे हे दोन इरसाल नमुने ..
तर सुरवात करू senior (सायली ) पासून.. हिचे वर्णन करायचे झाले तर सावळी तरतरीत पण कधी कधी " आविष्कार " ( मतीमंद मुलांची शाळा ) ची member , तर कधी आपल्या अफाट वक्तव्याने समोरच्याला गारद करणारी ,सावळी( काळी म्हणणे हिच्या गोरेपणाचा अपमान ठरतो ) डोळे चिन्यांशी जवळचा संबंध दर्शवणारे आणि भरून आले कि करवंद /भोकरे यांची आठवण करून देतात आणि उगीचच innocent पणाचा आभास निर्माण करतात ,नाक -नाक आहे असा पुरावा देणारा एक उंचवटा,केस- अस्ताव्यस्त ,बोकडासारखे वाढलेले फक्त शाळेत जाताना लाल पटट्याच्या आत कसेबसे दडवलेले
हिची आमच्या घरात entry झाली ती ताईमार्फत ..एक छोट काळ sorry सावळ गाठोड स्वरूपात , junior ची entry हि senior च्या राजवटीला हादराच होता पण हळू हळू दोघांनी मिळून कुरबुर न करता दंगा मस्तीचा धंदा सुरु केला .. हे दोघे घरोघरी जोडीने जातात आणि डोंबारयाच्या खेळाप्रमाणे एकेक अफाट लीला दाखवतात ..
Building चा दिवस सुरु होतो तो senior black च्या आईच्या ओरडण्याने आणि junior white च्या स्वत:च्या अगम्य भाषेतल्या पहाटेच्या गाण्यांनी ..
सुट्टीच्या दिवशी मात्र मला पाहते ८.३०-९ वाजता उठावे लागते कारण एकदा ह्या दोघांचे सनई चौघडे सुरु झाले कि निद्रादेवी bye bye करत निघून जाते ..मला बापडीला एक फायदा मात्र होतो कि senior black ळं ताईला उठवल्याचा आसुरी आनंद मिळत नाही ..
senior black ला ताईच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक ..मग ताई शी कितीही भांडण होऊ दे ..
साधारण रात्री १० ला तिच्या घरी सूर्य उगवतो मग रात्री बाजार रहाट करून हि मंडळी घरी येणार मग जेवण,अभ्यास वगेरे होऊन "वाजले कि बारा" होतात .. अर्थात तीला जेवणाचा कधीच problem येत नाही कारण रुपाली ताई किंवा भावेकाकिंकडे तीच part 1 जेवण झालेलं असते,
फक्त होत अस कि सकाळी उठायला उशीर होतो आणि मग शाळेची रिक्षा येईपर्यंत हीच जेमतेम आवरत मग horn वाजला कि हि बया चप्पल शोधायला सुरु करणार ती पण आधी शेजारी मग सापडली नाही कि स्वत:च्या घरी ..तेव्हा मात्र junior तीला जाम पकवतो आणि बाकीच्या मुलांबरोबर हा पण ओरडत सुटतो..
शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त हि वशिला लावण्यात एकदम पटाईत..कुठल्याही वस्तूला पैसे लागतात कळल कि जीव गेला तरी ती हट्ट नाही करणार यामुळे राजकारणातली एक प्रभावी व्यक्तिमत्व होऊ शकेल असा आमचा कयास ..आणि काही वेगळ झालच तर नामचीन गुंड बनण्याची दाट शक्यता ."दुसरयाची वस्तू तिसऱ्याला देऊन चौथ्याकडून स्वत:च काम करून घेण हे तिलाच जमेल "
"वार्तापत्र-तरुण भारत " चंटलमे" "काळू"" गेंडा " अशी अनेक नावे कमावलेली.. कुठल्याही गोष्टीची हिला पक्की खबरबात असते आणि इकडच तिकड सांगून मोठी बिकट परिस्थिती निर्माण करू शकते .त्यामुळे बोलताना जरा सांभाळूनच बोलाव लागत कारण तीच आपल्याकडे लक्ष नाही असा आपला गोड गैरसमज असतो ..ती जरी उजव्या हातांने कपाळावर पसरलेल्या केसांना किंवा कानामागील केसांना वळण देत ,ओठ मुडपून ते दातांनी चावत ,दृष्टी शून्यात लावून, एक पाय मुडपून बसली असेल तरी तिच्या कानातील पेशी अचूक काम करत असतात आणि सगळ रेकॉर्डिंग मेंदूत चालू असत ती parallel processing चे एक छान exmple आहे
आता फारशी लांबड न लावता वळूया second member कडे ..
junior white ..(कुणाल) डोळे सर्व काही सांगून जाणारे ,व्यक्त होणारे ,आणि मिश्किलपणे मिटणारे केस- रेशमी मऊसुत मात्र जावळ केल्यानंतर डोक्याशी ९० अंशाचा कोन करून कायम निवडणुकीला उभे ..नाक - नाकाची ठेवण senior सारखीच पाय-बसताना दुमडून बसणारं फावड ,तोंडाच्या बोळक्यात १०-१२ दात उगवलेले ,पोट अंमळ सुटलेले.. डेरी म्हणायला हरकत नाही,उंची दीड फुट त्यामुळे भावेकाकिंकडून "ठीली " पदवी कमावलेली त्याशिवाय शोनू ,मोनू ,मोन्या ,मोनालिसा, झंपक , दुधीभोपळा, लबाड ,चिखलू ,झिपर कुत्रं असे अनेक पदव्यांचे मानकरी ...
हा पहिल्यांदा घरी आला तो आईच्या कडेवर बसून केविलवाणा ,साधासुधा चेहरा घेऊन मग चालता बोलता येईपर्यंत हि मूर्ती घरात अशीच अवतरायची नंतर मात्र खालूनच आई ताई अम्मा अश्या बोंबा फोडून "खाली या आणि मला न्या" हे सुचवायला लागली ..
आणि मग आज्ञापालन करायला ताई खाली आली कि ताईचा हात पकडून जीना चढताना ,पायरयावरचा कचरा बघून हजारदा " शिया " आणि पोटावर हात टेवुन" याक "केल्यावर पायरयांची गणती सुरु होते आणि त्या साधारणपणे आथ (८) ,पाच असतात ..
वर आल्यावर सर्व खेळणी जी कायम आमच्याच घरी safe deposit मध्ये असत ती धडकन जमिनीवर ओतून खाऊ खायला स्वयंपाक घरात जाऊन अम्मा कडून हवा तो खाऊ मिळाला कि बाहेर येताना जणूकाही आपण त्या गावचेच नाही असा तो खेळण्यांचा पसारा घालणारे आपण नाही असा कटाक्ष टाकून हे स्वामी त्याच्या घोड्यावर बसतात आता खरा खुरा घोडा काही आमच्या घरात नाहीये हो ..दोन खुर्च्यांच्या हातांवर बसणे म्हणजे त्याचा टपटप (घोडा)...चुकून मी ती खेळणी भरायला गेले तर तो पुन्हा ती सारी खेळणी सगळीकडे पसरवून ठेवणार आणि मला शिक्षा म्हणजे ती तो bed च्या खाली लांब टाकून देणार ...
computer वर पकपक पकाक आणि finding nemo हे picturs पाहण्याकरता काहीवेळा ताईला मस्का मारावा लागतो आणि ताई मग बाबांचे नाव काय हे विचारते त्यामुळे आधीच तो computer ला " बौबन "(बबन ) हे वडिलांचे नाव password सारखे देऊन ताईला मस्का मारतो मग ताई तो password accept करते आणि picture चालू होतो
घरी कोणी आले आणि junior तिथे असले (हि शक्यता ९९ टक्के असते कारण हे जवळ जवळ इथेच असतात) .. तर हा पाहुण्याला पुरता तोलुंन मापून तो त्याच्याशी अम्मा ,बाबा आणि ताई ने बोलाव कि नाही हे ठरवतो ..सुरवातीला लांबून टेहळणी झाली आणि त्या व्यक्तीने ह्याच्यात interest दाखवला तर स्वारी खुश .. नाहीतर हा आपल्या अगम्य भाषेत बोलायला सुरवात करून नको करतो ,समोरचा माणूस बाळाचे ??? कौतुक करतो पण त्याची हि शिव्यांची code language आम्हाला ओळखीची आहे ह्यावर heights म्हणजे त्याच्याकडे बघून "काय शिये?" म्हणायला पण हे कारट घाबरत नाही
बोलता यायला लागल्यावर हे फक्त प्राण्यांची नावच बोलायला लागला .पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत ..हत्तु,चित्ता,हम्मा, हली (हरीण),तता(ससा ),गेंगा ( गेंडा ) , हे त्याचेच शब्द खास त्याच्या dictionary तले ...
कुका ( झोका) ,मध्ये झोपताना मात्र हत्तु आणि चित्ता लाच ह्याच्या बाजूला झोपण्याची अनुमती असते आणि "ढूढू " ( बौदूक ) ह्याची प्राणप्रिय ..हाताच्या ढूढू ने मारले तर गोळी लागून " ओहूउ " ओरडत पडण्याचा अभिनय कोणत्याही action hero ला जमला नसेल ..
पाल, कोई (कोळी ) कौक्लोच (झुरळ ) ह्याला कुठूनही दिसतात आणि मग हि दीड फुटी ठीली ५ फुटी काठी पेलवत त्यांना मारायला सरसावते ..
तर अश्या ह्या senior bleck आणि junior white limited company भावे काकीना राधा कृष्णाची जोडी दिसते आणि राठोडांच धाकट ,सावंतच नकट भाव्यांच्या घरात धिंगाणा घालायला लागतात .. junior आपल्या गोड आवाजात " थायली" ," थायलु" हाक मारत आणि senior " काय ले बबडी " म्हणत धिंगाण्याला green signal देत ...
आणखी पावसकरांच्या घरात हि पालखी फिरून आली कि १० वाजता ह्या दोघांना आपापल्या घरात घालवावं लागत
हि जोडी आपापल्या घरात जाते ती पुन्हा दुसरया दिवशी full energy ने नवीन लीला दाखवण्यासाठी ..
कधी कधी स्वार्थी विचार येतो डोक्यात कि हि दोघी राहावी अशी लहान ,छोटी ,मस्तीखोर गोड गोड बोलत चंदा ताईला छळणारी
आम्हालाही त्यांना घालवताना,पिटाळताना वाटत हि दोघ खेळत बसावी अशीच आमच्या घरात ...
बसाव असेच आम्ही त्यांच्या खेळण्यात दंग होऊन बाकीच्या काळज्या चिंता विसरून ..