तीला जाऊन आज २९ सप्टेंबर २०१० ला अकरा वर्ष होतील , अजूनही ती आठवली कि डोळ्यासमोर तरळते ती धूसर मूर्ती ..
आणि एक तप्त अश्रू गालावरून ओघळतो .
अखेरची आठवते ती . . कापसासारखे निर्जीव भूरभूरणारे केस,शांतपणे बंदिस्त झालेले तिचे डोळे,एका भिंतीच्या आधारे बसवले गेलेले तिचे कलेवर . .
जयूताई ...!! चार शब्दात संपणारे तिचे नाव . . पण अस्तित्व? कायमचेच संपलेले आहे ..पण आठवणी मात्र कधीही न संपणारया. .
ती गेली आहे शांतपणे तिच्या मार्गाने ,कधीही परत न येण्यासाठी . .
माझ्या वयाच्या साडेतीन महिन्यांपासून मला सांभाळायला असणारी जयूताई. .!!
तिच्या अखेरच्या क्षण पर्यंत मला सांभाळणारी जयूताई ..!!
आई,बाबा कामाला जाताना जिच्याकडे विश्वासाने मला सोडून जात ती जयूताई ..!!
जातीच्याही पलीकडे जाऊन एक मायेचा ,विश्वासाचा बंध निर्माण करणारी ती जयूताई..!!
माझ्या न कळत्या वयात तिनेच मला जपल ,माझी अल्लड वयातली सगळी छोटी मोठी सुख,दुख तिने जपली .
तिच्याबरोबर खूप वेळा लुटुपुटुचे भांडण व्हायचे आणि दोन क्षणांनी तीच लागायची ..
प्राथमिक शाळेतली मैत्रिणीबरोबर भांडण, छोटे मोठे रुसवे फुगवे मी तिलाच सांगायचे ,
मी माझ्या त्या दुखांचे ओझे दप्तरासकट तिच्यावर सोपवायचे कि पुन्हा भांडायला रान मोकळे. .
तिच्या घरीहि मी बरेच वेळा जायची ,ती मांसाहारी पण कधीही माझ्या शाहाकारीपणाला तिने धक्का लागू दिला नाही
आजीच्या(तिची आई ) लोखंडी पेटीतून १० पैसे घेऊन त्याच्या फुकनळ्या आणून
त्या ५ फुकनळ्या पाच बोटात अडकवून खाल्ल्यात मी ..एकही तीला ,तिच्या घराच्याना न देता.. आता आठवल की हसू येत स्वत:वर . .
शाळेतून घरी आल्यावर बरयाच वेळा माझ्या भेळेचा हट्ट हि तीने आपल्या पैशातून पूर्ण केलाय
घरी आई , चार बहिणी ,दोन भाऊ ..बहिणी पण धुणी भाडी करणाऱ्या ,एक भाऊ वकिलांकडे शिपाई ,परिस्थिति यथा तथाच..
पण तिच्या गरिबीची झळ मला त्या वयात कधीही लागली नाही, याच मला प्रचंड वाईट वाटत आता .
ती माझे सर्व हट्ट पुरवत असे ..
मग ती भेळ,खारे शेंगदाणे असो किंवा जत्रेतील खेळणी असो . .
तिच्याकडून हे सर्व करून घ्यायचे हा माझा अधिकारच असे आणि ती हि तो न बोलता मान्य करायची ..
आम्हाला ती कामवाली, सांभाळणारी आया कधीच वाटली नाही कारण तिच्या मायेने त्या मर्यादा कधीच धूसर झाल्या होत्या
ती अलगदपणे आमच्या घराच्या त्रिकोणाची चौथी बाजू बनली होती..
बाबा तर तिला गंमतीने जयुताई म्हणजे पंतप्रधान म्हणत असत . .
या १३ वर्षाच्या काळात माझ्या बरोबरच आई,बाबा ,नातेवाईक , शेजारी,शिक्षक ,मैत्रिणी साठी सुद्धा ती " जयूताई " झाली होती,ते माझ्या आणि तिच्या जोड गोळीला चिडवत हि कि कधी सोडणार ग तू विस्मयीला? , मला असा राग यायचा, वाटायचं ह्यांना काय करायचंय , ती सोडेल नाहीतर राहील माझ्याजवळ ... ती मात्र हसायची ..
मला फार भीती वाटायची तेव्हा कि खरच ही नाही ना सोडून जाणार मला ??
मला ती फक्त माझीच अणि माझी वाटायची , माझ्याकडे लक्ष नाही दिल तिने तर नाकावर राग यायचा आमच्या ..
आता कळतंय ती माझी तिच्याबद्दल वाटणारी ओढ़ होती . .
ती सुरवातीला माझ्या चुलत भावंडाना सांभाळायला होती ,नंतर मला.. त्यामुळे ती आमच्या कुटुंबातलीच एक होती ..
एकदा बालवाडीत असताना केवळ ती रेनकोट आणायला विसरल्याच वाटून मी भोकाट पसरलं होत,ती मात्र त्या मुसळधार पावसात आपली जुनी छत्री घेऊन माझा रेनकोट हातात धरून वर्गाच्या बाहेर शांतपणे उभी होती .
माझ्या डोळ्यासमोर तिची अनेक रूपे उभी राहिली..
तिसरीत असताना माझी चप्पल शेणात बुडाली तेव्हा ती काढून धुणारी जयूताई,
आणि बिनदिक्कत पणे पाय वर करून तीला चप्पल काढून देणारी मी ...
दर १४ एप्रिल ला पुढच्या वर्षी मी तुला सांभाळायला नाही म्हणत राहणारी ती ,
संध्याकाळ झाली कि पुरया घाणेकर आळीत फुल शोधायला ती बाहेर पडणार आणि तिच्या मागून मी ...
मोठी झालीस कि विसरशील म्हणणारी ती,रस्त्यात दिसलीस कि " ढू " दाखवून जाशील म्हणणारी ती...,
विस्मयी खूप अभ्यास कर छान मार्क मिळव म्हणणारी ती ,आणि दर वर्षी result लागला कि दुध कोल्ड्रिंक पिऊन आनंद साजरा करणाऱ्या आम्ही ..,
आणि अश्यातच मी दहावीला असताना तो दिवस उजाडला .उजाडला कसला आयुष्यातील एका बाजूला अंधारच घेउंन आला .कधीही जास्त आजारी न पडणारी ती दवाखान्यात आसन्नमरण अवस्थेत होती.. डॉक्टरांनी निदान केल " cancer "...
आपल्या रोगाची कल्पना नसणारी ती माझ्या डब्याची चिंता करत होती ,ती नसल्याने आईची होणारी गैरसोय ती पाहत होती .
पण cancer च्या जीवघेण्या ,भयानक आजाराने तिचे शरीर पोखरत चालेल होते.तिलाही आता अखेरच्या क्षणाची चाहूल लागली होती .तिच्याजवळ गेल्यावर तिचे कोरडे ,निस्तेज डोळे बघावयाचे नाहीत ,सारख पाणी पाणी ओरडणारया तीला नाही पाहावयाच नाही ... ICU तून बाहेर आल्यावर तिचा दिवसेंदिवस कृश होणारा देह त्वरेने कमी होणारे वजन ,घरच्यांच्या समाधानासाठी केलेल्या operation मुळे आणीच निस्तेज झालेली ती ....
लहानपणी माझ्या मनावरचे ओझे तुझ्यावर टाकून मी निर्धास्त होत असे ,आज मात्र माझ्या मनावर रुखरुखीचे ओझे टाकून ती निघून गेली, माझा दहावीचा result सुद्धा तीला ऐकायचा होता तो तीला कसा सांगणार आता ?माझ्या पेक्षा तुला दसपटीने होणारा आनंद मी कसा पाहू ग आता ?? कोणत्या आकाशी शोधू तुला? ?
तू मला चिडवायाचीस मोठी झाल्यावर मी तुला ओळख देणार नाहीस,तुझ्या लग्नाची साडी घेतल्याशिवाय मी जाणार नाही ,मग का गेलीस अशी वचनाला न जगता?मी नसते ग विसरले तुला कधीच . . का मला जन्मभराची रुखरुख लावून गेलीस ?
मला मिळालेले छोटुस यश, चिटुकली नोकरी यांचा आनंद मी तुला कसा सांगू ग . . ??
कुठे भेटशील मला आता परत तू . . ??
आवर्जून काही सांगायचेच होते
पण नाजूक त्या क्षणांना ओठात शब्द विरले. .
डोळे भरून तुजला पाहायचेच होते
आनंद मज मनीचा तुज सांगायचाच होता ..
एकाच त्या क्षणाने पुरताची घात केला
अश्वत्थाम्याची जखम, मन जन्मभर वाहणार आता .
मी वाहणार आता . . . . ..
मन...अवखळ झऱ्या सारखे .. कधी शांत कधी खळखळ वाहणारे . . कधी झूळूझुळू वाहणारे कधी फेसाळून येणारे . .
Wednesday, September 29, 2010
Saturday, September 11, 2010
"चौकटतीवर बालगणपती चौसोपीखण स्वागत करती"
आज जरा उशीरच उठले .. कारण काल रात्री ३ वाजे पर्यंत डोळ्याला डोळा लागला नाही .. लागणार तरी कसा ? एवढ्याश्या डोळ्यात ढिग भर समुद्र जो भरला होता . .यावेळी गणपतीला मी पहिल्यांदाच घरी नाही ...
हलक्या हाताने उसळणारया आठवणींच्या लाटा थोपवताना गोड गोजिऱ्या क्षणांच्या मोत्यांनी ओंजळ भरून गेली होती . .
हलकेच डोळ्यासमोर तरळल माझ गावातल कौलारू घर. . "आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू" अगदी तस्स.. फक्त आता मातीच्या रूपातून सिमेंटच्या नव्या वस्त्रात सजलेले .. पण मुळ ढाचा तोच असलेल ,मायेचा ओलावा आणि माणसांची श्रीमंती न संपलेले माझ..आमच सगळ्यांच घर...
माझा नयनांच्या पावलांनी मी आमच्या अंगणात उतरले,पावसामुळे गुळगुळीत झालेल्या पायरयान वरून अलगद सावरत सावरत . .
अंगणात पाउल ठेवायला जागाच नव्हती नुकतीच पहाटेच्या हलक्या झुळुकीने अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा घातला होता,तिथे दिसले मला बाबाकाका आणि दिलू काका पंचा पसरून ती इवलुशी फुल गोळा करताना ...
सगळ घर अगदी "चौकटतीवर बालगणपती चौसोपीखण स्वागत करती" अस दिसत होत. .मी धावत घरात शिरले , पडवीत सगळे उठायच्या विचारात होते,जयेश चुळबूळ करत होता. संपन्न मात्र डोक्यावर पांघरून घेऊन साखर झोपेत होता .. काल रात्री खूप जागून,७-८ वेळा चहाचे sessions होऊन,हास्य कल्लोळात गप्पा मारत मारत सजावट पूर्ण झाली होती .. खांबांना बांबूनी पानांनी झाकले होते ,सगळीकडे लाल झालर असलेली पांढरी छत,त्यांना लटकणारी प्लास्टिक ची झगमगती तोरण ,हलकेच प्रकाश फेकणारी lights ची तोरण...
डावीकडे झोपाळ्यावर आशय छान बिछाना करून झोपला होता ... त्याला पाहत पाहत मी पायरया नी पडवीतून वरून ओटीवर आले , उजव्या बाजूला नजर आपसूक वळली आणि दिसलं गणरायाच्या आगमनाला सज्ज झालेलं लाकडी मेज.. अरेच्चा त्याचा नूर तर काही वेगळाच होता ..आज ते जरतारी वसन ल्यायले होते,मेजाचे खिसे अत्तराच्या कुप्या , धुपाचे डबे ,कापुराची पाकिटे ,उदबत्त्या ह्यांनी ओसंडून वाहत होते
मागच्या भिंती थर्माकोल ,रेशमी वस्त्रांनी सजल्या होत्या,ओटीला एखाद्या महालाचे स्वरूप आले होते ..
माझा डावीकडच्या छोट्याश्या खोलीत गणपती बाप्पा waiting mode मध्ये बसले होते. बंडूकाका त्याला मोत्याचे, सोन्याचे दागिने, घालुन सजवत होता..
मी समोरच्या दारातून आत माजघरात जायला लागले ,आपसूक हात जोडले गेले आणि नजर वर गेली .. दारावरच्या आजोबाआजींच्या फोटोला नमस्कार करून मी आत गेले ..
तिथे चैत्राली छान झोपली होती .मी दचकून इकडे तिकडे पाहिलं मग लक्षात आल कि मी हजारो मैलावर आहे मी नाहीये तिच्या बाजूला गोधडी पांघरून झोपायला आणि मग ठरवून दोघींनी एकदम उठायला ..
तशीच उजव्या बाजूने सावकाश मी आत गेले तिथे मस्त ताज्या दुधाचा चहाचा वास दरवळत होता, आईने मस्त चहां केला होता.. चहां पीत पीत काका,दादा यांचा गप्पांचा अड्डा जमला होता ,स्वयंपाक घराला लागुनच आणि एक छोट्या पडवीत मोदकाची तयारी चालली होती ..गप्पा मारता मारता मुग्धाकाकू,सुनीताकाकू आणि गायत्रीवहिनी खवलेल्या नारळाची ताटे हातावेगळ्या करत होत्या,नव्याने सरपंच झालेली अनघा काकू घराचा आणि मध्येच गावचा संसार सांभाळत होती.. मागच्या पडवीत दाराशी कामाला येणाऱ्या अनु, तिची सून आणि नातू यांची चहाची पंगत बसली होती ...
अशीच धावत मी मागच्या दारातून बाहेर आले ,उजवीकडे तुळशी वृंदावन मोठ्या दिमाखात उभं होत कारण आता एकटी घरची काकू नाही तर सगळ्या काकू, वहिनी,आत्या,आई आंघोळ आटपल्या आटपल्या धावत पळत लगबगीने तुळशीपाणी करायला तिथे येणार होत्या
चुलाण्यावर हंड्यात ढणाढणा पाणी तापत होते..बाबा नेहमीसारखे कुठल्यातरी कामात व्यस्त होते थोड्यावेळाने जयेश ला धरतीलच ते हाताखाली काम करायला ...डावीकडे माझी चुलत चुलत भावंडे आंघोळीचे कपडे हातात घेऊन आंघोळीच्या तयारीत होती,कुणी चुलीजवळ शेक घेत होती,कुणी तोंडात brush घेऊन ब्रह्मांडात डोळे लावून होते,माहेरवाशिणी बहिणी आपल्या मुलांच्या पाठी पळत होत्या..
या सगळ्यांकडे पाहत पाहत मी परत फिरले. .
आता स्वयंपाकाघरात दुपारच्या जेवणाची तयारी सुरु झाली होती.
सगळे मोदक निवेगरया,चटणी,कोशिंबिरी (कधी कधी अतुल दादा जरा मीठ कमी जास्त असेल,ककड़ी जुन असेल तर त्याला "काचो" =काकडीचा चोथा म्हणतो),वरण भात अस calender वर पाच दिवसांचा ठरवलेला menu करण्यात मग्न होते, माज घरात आता सगळ लख्ख आवरलेल होत,
देवघरात छान पूजा झाल्याने अगरबत्तीची वलय फुलांच्या सुगंधाबरोबर खोलीत भरून राहिली होती.बाहेर ओटीवर गणपतीबाप्पाहि षोडशोपचारे पूजा आटपून स्थानापन्न झाले होते..बाजूला शेणाने सारवलेल्या जमिनीवर छान रांगोळी घातलेली होती.. मी नाही आज रांगोळी काढायला तिथे .. !!
एकीकडे शेखरकाका दुर्वा आणि एक्झोरा (आईच्या भाषेत एक्झोस )च्या फुलांची माळ गुंफत होता . बाबाकाका प्राजक्ताच्या फांद्याचे दोरे काढून देत होते आणि मुलं त्यात फुल ओवत होते.काकांनी कमळेहि आणली होती मागच्या परसात जाऊन, त्याच्याही देठ दुमडून माळा करायला घेतील ते आता ..
ओटीवरच्या पायरया उतरून खाली आले तर आता झोपाळा रिकामा होता ..तो सज्ज होता आता दर्शनाला येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागताला, लहान मुलांचा उंच झोका व्हायला आणि संध्याकाळच्या पर्वचा ऐकायला ,दुपारच्या वेळी पंढरपुरहून गणपतीत येणारे पेटीवाले,तबलावाले ऐकवातील आपली कला तिथेच ..
खूप मस्का मारल्यावर सगळे काका,बाबा अनेकदा सांगितलेल्या भुताच्या गोष्टी पुन्हा सांगायला तिथेच बसतील ,मग सगळी मुलं,बायका बसतील अवती भवती ... झालेल्या गोष्टी पुन्हा निघतील, प्रत्येकाचे ठरलेले mimicry item पुन्हा नव्याने दाद मिळवून जातील,जुन्या पिढीतील लोकांच्या आठवणी निघतील,हास्याची कारंजी उडतील,कधी डोळ्यात पाणी भरून येइल ...
घराच्या मुख्य दारातून मी बाहेर अंगणात आले नयनांची अश्रूंनी केलेली घुसमट थोपवताना दिसलं त्या कृष्णकन्हयाच मंदिर .. मी धावत तिकडे निघाले..
डावीकडे गोठ्यामधून हंबरण्याचे आवाज येत होते.प्राजक्ताच्या फुलांचे सडे,आजूबाजूला गणेश वेलीची मध्ये डोकावणारी फांदी ,चाफ्याचे झाड,तगर ,सायंकाळीची वेगवेगळ्या रंगांची झाड मागे सारत पाउल वाटेवरून मी देवळात पोहोचले ...
तो लबाड मुरली हातात धरून ,पाय दुमडून मिश्कील हसत उभा होता ...
घरापासून दूर असले तरी माझी माणस,त्यांच्या आठवणींच घरकुल आहेच ना माझ्या हृदयात कायम??
दूरवर आणखीही मिळाली आहेत माणस मला.. अशी जाणीव पुन्हा त्त्याने करून दिली आणि मीही मग
हसत हसत झोपी गेले त्या सावळ्या रुपाला ह्रदयात साठवत . . ..

Subscribe to:
Posts (Atom)

.jpg)

.jpg)