श्या कसला नवरा मिळालाय ? नाही म्हणजे अस नाही म्हणायचंय कि खूप वाईट आहे. तसा चांगलाच आहे ,चांगला म्हणंजे खूप खूप चांगला…. आता म्हणाल येवढा आहे तर वाईट का म्हणतेय ? कारण त्याला कविता ,साहित्य,नाट्यसंगीत वगेरे कसलही "वेड" नाही आणि मी पडले या सगळ्याची महावेडी. तानसेन नसले तरी स्वघोषित उत्तम कानसेन पण नवऱ्याला थोडही वेड नसाव या सगळयाच .??
नाही बाबा match होत हा गुण !! कधी कधी उगाचच एवढ वाईट वाटत कि हा असला वेडेपणा असता याच्यात तर काय झाल असत ? सर्व सामान्य लोकांना सुद्धा आवड असते मग हाच चुकला फकीर कुठे फिरायला गेलेला देव आवड वाटत होता तेह्वा !!
जेह्वा बाकी लोक छान लिहील आहेस ,बरेच दिवसात काही नवीन नाही. अशी मनाला आवडणारी स्तुतिसुमने उधळत असतात तेह्वा हा मात्र काय लिहील आहेस ते कळत नाही ज़र सोप्प लिही सांगतो… अस्सा राग येतो . ह्याला कविता समजवावी लागते between the lines सांगाव लागत.हद्द झाली बाई!! बर असही नाही कि याची लस टोचून मिळेल आणि हा गुण येईल . मैत्रिणीचा नवरा हि "असाच" unromantic निघाला कि खळखळून हसायला येत तर काही मैत्रिणी तो तुझ्या कवितांच्या कचाट्यातून सुटला असहि म्हणून मोकळ्या होतात .
अस वाटत कि कस समजवावं ह्याला कि लिहिण्यातला आनंद काय असतो? किती miss करतोय हा हे सगळ . मग उगीचच त्याच्याबद्दल मनात कळकळ ,सहानभुती ,भूतदया ,मळमळ सगळ काही दाटून येत क़ि किती बिच्चारा आहे हा कि ह्याला काही कळतच नाही . काही दिवस ठुसठुसणारी जखम घेऊन फिरते कधीतरी खपली निघते,मग माझ्यात पु . ल. चा सखाराम गटणे अवतरतो साहित्यप्रेमीच्या रूपात ..
पण परवाच्या प्रसंगाने मात्र माझे आंधळे साहित्य प्रेम डोळस झाले . नवरोजी एका project च design घरीच करत होते हज्जारवेळा इकडून तिकडे तिकडून इकडे फेरया झाल्या , मी पाहतेय हा माणूस कागदावर एक रेषा काढत नाहीये ,न Auto-cad open आहे आणि म्हणे design करतोय . Paper ,sheets ,pencil ,board सगळ bed वर पसरलेलं जस काही कुणी लहान मुल अभ्यास करत . चार पाच दिवस हेच चालू आहे . शेवटी न राहवून अजून दोन दिवसानी मी विचारलच कि हे काय चाललंय ?? तुझ so called design कागदावर येणार कि direct हवेत बांधणार ? त्यावर त्याने जे काय उत्तर दिल त्याने माझे तीन तेरा वाजले ,साहित्याप्रेमाची फुलपाखरे उडू लागली… डोळ्यापुढे काजवे ,तारे चंद्र , सूर्य सगळ काही चमकल .
"याला म्हणतात सृजनापुर्वीच्या कळा ,तुम्हाला काय वाटत design करा म्हटलं कि होत का करून ?त्याच्यामागेही एक विचार असतो ,एकदा का विचार सुचला कि design आपोआप उमटलं जात ते सुचवा म्हटलं कि सुचत अस नसत; एखादी कल्पना सुचेपर्यंत थांबायला लागत " मी दोन क्षण शांत… मग मनात कौतुकाच्या उकळ्या फुटायला लागल्या …
अरेच्चा … साहित्य काय कला काय दोन्हीमधील सृजनशीलता एकाच मापदंडावर नाही तोलता येणार. त्याला साहित्यातल नाही कळल तरी कलेतलं कळंतच कि . . सृजनशीलता जिच्याबद्दल मला आदर आहे कुतूहल आहे ते मी लेखनातून मिळवते तो कलेतून मिळवतो , मी प्रत्येक्षातले कागदावर उतरवते तो कागदावरच प्रत्येक्षात ,हाच काय तो फरक …
मी मनोमन कृतकृत्य झाले कि असो अगदीच काही आपला नवरा "हा" नाही …जरि त्याला काही कळलं नाही,अजूनही समजवावं लागत तरी मी हल्ली चिडत नाही मी enjoy करते त्याच ठोंबेपण …
नाही बाबा match होत हा गुण !! कधी कधी उगाचच एवढ वाईट वाटत कि हा असला वेडेपणा असता याच्यात तर काय झाल असत ? सर्व सामान्य लोकांना सुद्धा आवड असते मग हाच चुकला फकीर कुठे फिरायला गेलेला देव आवड वाटत होता तेह्वा !!
जेह्वा बाकी लोक छान लिहील आहेस ,बरेच दिवसात काही नवीन नाही. अशी मनाला आवडणारी स्तुतिसुमने उधळत असतात तेह्वा हा मात्र काय लिहील आहेस ते कळत नाही ज़र सोप्प लिही सांगतो… अस्सा राग येतो . ह्याला कविता समजवावी लागते between the lines सांगाव लागत.हद्द झाली बाई!! बर असही नाही कि याची लस टोचून मिळेल आणि हा गुण येईल . मैत्रिणीचा नवरा हि "असाच" unromantic निघाला कि खळखळून हसायला येत तर काही मैत्रिणी तो तुझ्या कवितांच्या कचाट्यातून सुटला असहि म्हणून मोकळ्या होतात .
अस वाटत कि कस समजवावं ह्याला कि लिहिण्यातला आनंद काय असतो? किती miss करतोय हा हे सगळ . मग उगीचच त्याच्याबद्दल मनात कळकळ ,सहानभुती ,भूतदया ,मळमळ सगळ काही दाटून येत क़ि किती बिच्चारा आहे हा कि ह्याला काही कळतच नाही . काही दिवस ठुसठुसणारी जखम घेऊन फिरते कधीतरी खपली निघते,मग माझ्यात पु . ल. चा सखाराम गटणे अवतरतो साहित्यप्रेमीच्या रूपात ..
पण परवाच्या प्रसंगाने मात्र माझे आंधळे साहित्य प्रेम डोळस झाले . नवरोजी एका project च design घरीच करत होते हज्जारवेळा इकडून तिकडे तिकडून इकडे फेरया झाल्या , मी पाहतेय हा माणूस कागदावर एक रेषा काढत नाहीये ,न Auto-cad open आहे आणि म्हणे design करतोय . Paper ,sheets ,pencil ,board सगळ bed वर पसरलेलं जस काही कुणी लहान मुल अभ्यास करत . चार पाच दिवस हेच चालू आहे . शेवटी न राहवून अजून दोन दिवसानी मी विचारलच कि हे काय चाललंय ?? तुझ so called design कागदावर येणार कि direct हवेत बांधणार ? त्यावर त्याने जे काय उत्तर दिल त्याने माझे तीन तेरा वाजले ,साहित्याप्रेमाची फुलपाखरे उडू लागली… डोळ्यापुढे काजवे ,तारे चंद्र , सूर्य सगळ काही चमकल .

No comments:
Post a Comment