"अर उडीव ना फुगे बावळ्या काय बघित बसल्यास ?" देवा ओरडला तसा बिट्टू एकदम दचकला .
समोरच्या playground वर मुलं क्रिकेट खेळत होती. कधी पासून त्याची नजर तिकडेच लागली होती.four ,six जाताच ओरडणारी मुलं,जीव तोडून ball अडवण्याचा प्रयत्न करणारी मुलं ,bat ने फटका मारणारी मुलं पाहण्यात तो अगदी रंगून गेला होता .
काही न बोलता हातातली रिंग पुन्हा साबणाच्या पाण्यात बुडवून तो फुगे उडवायला लागला ..
१० वर्षाचा पोर तो .. बाबांबरोबर सकाळ पासून पायाला भिंगरी बांधल्यासारख पुरा गाव पालथ घालायचं आणि प्लास्टिकचे पोपट,मोर ,चिमण्या ,कोंबड्याच्या जोड्या ,फुगे उडवायला लागणाऱ्या साबणाच्या पाण्याच्या डब्या ,गंगावन,रिबिनी एक ना अनेक वस्तू विकायच्या ...
पूर्वी खर तर कित्ती आवडायचं त्याला हें असे साबणाचे फुगे उडवायला ,उडताना पाहायला...
फुग्याच्या बाटल्या विकत घेतल्यावर लहान मुलं लगेचच त्या उघडून रस्त्यावरच फुगे उडवायला सुरवात करायची
किती छान वाटायचं ते फुगे...
हलके हलके, कधी शुभ्र दिसणारे कधी आत मध्ये वेगवेगळ्या रंगांची वलय आत नाचत असायची ..वाऱ्या बरोबर उंच उंच जाणारे ,एकदम दिसे नसे होणारे ,हातात पकडण्याचा प्रयत्न केला तर नाहीसे होणारे .
कोणी फुगे उडवले कि एकदम पक्ष्यांचा थवा उडावा तसे भर्रकन २०-२५ फुगे रस्त्यवर उडायचे आणि क्षणातच दहा दिशांना उडायचे.चालणारा कोणी एकदम भांबावून जायचा ,कोणी खुश होयचे तर कोणी चिडायचे कोणी आजी चष्म्यावर काय आल न कळून शिव्या द्यायला लागायची तर कोणा शीघ्रकोप्याच्या डोक्यावर जाऊन बसलेला फुगा इतरांची करमणूक करायचा ..किती हसायचा बिट्टू तेह्वा ..दोन हातांची टाळया वाजवत पोट पुरेस्तोवर हसायचा तो..त्या निरागस हसण्याने त्या फुग्यांना पण आणी जोर यायचा आणि वर वर आकाशात जायचे ते पठ्ठे ..देवाने त्याला झापल कि कस बस येणार हसू थांबवत,हसून हसून पाणी आलेले काळेभोर डोळे पुसत मागे वळून आकाशाकडे पाहत पाहत तो पुढची वाट पकडायचा .
किती हट्ट करायचा तो देवाजवळ त्या फुग्यांसाठी .."आपुनच करतो नव्ह त्या फुग्यांच्या बाटल्या तयार?? काय व्हइल एक म्या उडीवली तर ? "
त्यावर देवाच ठरलेलं उत्तर असायचं "माझ्या सोन्या समिजत मला,पण असली चैन गरीबाच्या पोरांसनी नसती र ,आपुनच अस उडीवायला लागलो तर इकणार काय नि खाणार काय र ?? शाना माझा बिट्टू तो ,तुला मी चन घेऊन देईन मग..."
हिरमुसलेल तोंड घेऊन बिट्टू चण्याच्या आशेने गप बसायचा .आपल्याकडून विकत घेऊन उडवलेल फुगे बघण्यात समाधान मानायचा .
एक दिवस मात्र देवाने आपणहून त्याल फुग्याच्यी एक बाटली दिली आणी सांगितलं कि तुला उडवयाचेत ना उडव फुगे खुस्श्हाल..
बिट्टू ला काय बोलाव कळल नाही .आनंदाने त्याने ती बाटली हातात घेतली ..त्या दिवसापासून आज पर्यंत फुगे उडवायला कधी ना नाही केल देवाने...
झाल अस देवाच्या एक दिवशी लक्षात आल कि जर ह्या पोराने फुगे उडवले तर खूप मुलं ते पाहतील आणी विक्री जास्त होईल ,नाहीतरी पोराला फुगे उडवायचे आहेतच एका दगडात दोन पक्षी ...आणी झालही तेच खूप सारी मुलं ते उडणारे फुगे पाहत आई बाबांकडे हट्ट करू लागली ५ रुपयाची मज्जा ..आईवडीलही मुलांना घेऊन देऊ लागले ..
देवा खुश होता आपला धंदा वाढलेला पाहत तेवढेच ५०-६० रुपये जास्त मिळायचे त्यांना,आणी पोराला फुगे उडवायला दिले हें हि सुख हि मिळायचे ...
बिट्टूला काही दिवस फार मज्जा वाटली,जसे जसे दिवस जायला लागले तसे आपल्या हट्टापायी बाबांना हें कराव लागल हि टोचणी त्याच्या मनाला लागायला लागली ,आता परत आपण त्यांना सांगितलं कि मला नाही आवडत हें अस फुगे उडवत राहायला.मलाहि क्रिकेट खेळायचं, four ,six मारायचेत ..मलाही त्या मोठ्या मुलांसारख खेळायचं तर पुन्हा त्यांना दुख होईल .आपल्या बालहट्टापायी बाबांनी जर येवडी झळ सोसून फुगे उडवायला दिलेत तर आता धंदा चांगल होत असताना आपण फुगे उडवायचो थांबलो तर त्यांना फार दुखः होईल ..काय झाल आपण नाही खेळलो क्रिकेट..पाहता तर येतंय कि ...
एक सुस्कारा सोडून,डोळ्यातलं पाणी झटकून टाकत बिट्टू ने पुन्हा रिंग साबणाच्या पाण्यात घातली आणी एक हलकी फुंकर मारली... पुन्हा ते आनंदाचे तरंग हवेत नाचायला लागले
त्यांना कुठे कळणार होते त्या इवल्याश्या जीवाचे दुखः..लहानग्या वयातला त्याचा तो समजूतदारपणा ..जीवनाचे वेगवेगळे रंग ..त्यांच्या सारखीच क्षणात नाहीशी होणारी कोणाची रंगीबेरंगी स्वप्न ..ते नाचत होते आपल्याच रंगाची वलय पोटात घेऊन ..उंच उंच आकाशात चालले होते आपल्या नादात ....

No comments:
Post a Comment