सोनेरी झळझळणार IT च जग
सोनेरी झळझळणार IT च जग
सकाळी उंच टॉवरच्या कांचात चमकणारा सूर्य
पहाटेला आता alarm आधीच जाग येते
कारण आधी आर्जवाने मग "उठ आता गधडे" म्हणायला आई जवळ नाही
हरवलेय बाबांच्या हाताच्या वाफाळत्या आल्याच्या चहाची चव
उरलाय फक्त cafe coffee day च्या lemon iced tea चा थंडपणा
आईच्या हाताचा वरण भात,त्यावर ओतलेले साजूक तूप
तेही पंचपक्व्वान वाटतंय आता खाताना cafeteria तल बेचव जेवण
college मध्ये अख्खा दिवस गप्पांना खंड नसायचा
आता शनिवार ,रविवारची वाट पाहत रोजचा दिवस संपवायचा
project,billable status च्या धबडग्यात हरवलेय कुठेतरी माझ्यातली मी
तिला शोधताना पुन्हा आणखी हरवत जातेय मी
क्षिताजात वसणार सुखदायक IT च जग लांबून छान छान दिसणार
जवळ गेल कि हळूच साबणाच्या फेसासारख नाहीस होणार

Pahatela alarm chaya aadhi tula zhopayala milatay he changala ahe.. Baryachada mi alarm chalu zhala ki zhopato ani band zhala ki uthato.. शनिवार ,रविवार kasa kay free milato IT madhalya lokana ? Those who get weekend and before alarm sleep in night r really lucky ..
ReplyDeletehmm..True...
ReplyDeletewow vismayi mast.
ReplyDeletekeep it up.